आर माधवन ऐवजी अभिषेक बच्चन या सीरिजमध्ये दिसणार आहे.

अभिषेक बच्चनने आपल्या नवीन वेब सीरिजची घोषणा केली आहे. अभिषेक बच्चन ऍमेझॉन प्राइमची ओरिजनल वेब सीरिज ‘ब्रीद’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसू शकतो, असा अंदाज बांधला जात होता. आता त्याने या सीरिजचे पोस्टरच रिलीज केले आहे. ‘ब्रीद इन्टू द शॅडो’चे पोस्टर रिलीज करताना त्याने याला दुजोरा दिला आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून तो डिजिटल पदार्पण करण्यासाठी तयार झाला आहे.

अभिषेकने शुक्रवारी सकाळी एक ट्विट करुन फॅन्सला वाट पाहण्यास सांगितले होते. एक मोठी घोषणा काही वेळात करणार असल्याचे सांगत ३० मिनिटानंतर त्याने ‘ब्रीद इन्टू द शॅडो’च्या सीरिजचे पोस्टर शेअर करत सर्वांना खूशखबर दिली.

 

आता हे पोस्टर वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अभिषेकने आपल्या टि्वटमध्ये येत्या १० जुलैला ऍमेझॉन प्राइम व्हिडिओजवर स्ट्रिम होईल, असे म्हटले आहे.

या सीरिजमध्ये अभिषेक बच्चनबरोबर अमित साध, नित्या मेनन, संयमी खेर प्रमुख भूमिकेत दिसतील. मयंक शर्माने याचे दिग्दर्शन करतील. ‘ब्रीद इन्टू द शॅडो’ वर्ष २०१८ मध्ये रिलीज झाले होते. यात आर माधवन आणि अमित साध यांनी भूमिका केली होती. त्याच्या सीक्वेलमध्ये अभिषेक काम करत आहे. आर माधवन ऐवजी अभिषेक बच्चन या सीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेब सीरिज पहिल्या भागापेक्षा जास्त मजेशीर आणि रहस्याने भरलेली असेल, असे बोलले जात आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *