अभिनेत्री अनुष्का शर्मा (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आजकाल कोणत्याच चित्रपटात दिसत नसली तरी ती सध्या निर्माता म्हणून बऱ्यापैकी सक्रीय आहे. अनुष्का शर्मा निर्मित ‘पाताल लोक’ ही वेब सीरीज नुकतीच प्रदर्शित झाली. ती प्रेक्षकांना खूप आवडली. ‘पाताल लोक’नंतर अनुष्का शर्मा आता प्रेक्षकांसाठी नवीन वेब सीरीज घेऊन आली आहे.

अनुष्का शर्मा निर्मित ‘बुलबुल’ या वेब सीरीजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगावर शहारे येतील. अनुष्काने इन्टाग्रामवर या वेब सीरीजचा ट्रेलर पोस्ट केला आहे. याला तिने ‘सर्व परीकथा काल्पनिक नसतात. काही परिकथा स्वत:चे सत्य सांगतात.’ असे कॅप्शन दिले आहे.

बुलबुल वेब सीरीज रहस्यमय आणि भयावह आहे. बुलबुलची कथा १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील असून बंगालच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ज्यामध्ये बुलबुलची व्यक्तिरेखा त्रिप्ती दिमरी यांनी साकारली आहे. या वेब सीरीजमध्ये बुलबुलचे लग्न होते. बुलबुलचे लग्न वयाने मोठ्या असलेल्या महेंद्र (राहुल बोस) यांच्याशी झालेले असते. पण तिला महेंद्रचा धाकटा भाऊ सत्या आवडत असतो.

सत्या बुलबुलला एक भयावह कथा सांगतो. ज्यामध्ये तो एका चेटकिणीचा उल्लेख करतो. ट्रेलरची सुरुवात या कथेपासून होते. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी लग्न केलेल्या बुलबुलला मनातून सत्या हवा असतो. काही वर्षांनंतर तिच्या नवऱ्याची हत्या होते. त्यावर बुलबुल सत्याला सांगितले की तिच्या नवऱ्याला चेटकीणीने खाल्ले. बुलबुलचा हा ट्रेलर बर्‍यापैकी रहस्यमय आणि भीतीदायक आहे. ही वेबसीरीज २४ जूनला नेटफ्लिक्सवर रीलीज होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *