‘तांडव’ वेब सिरीजवर बंदीच्या मागणीवरून स्वरा भास्करने केलेल्या ट्विटमुळे भडकले यूजर / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

डिजिटल प्लॅटफॉर्म ‘अमेझॉन प्राईम व्हिडीओ’वर 15 जानेवारी रोजी सैफ अली खान, डिम्पल कपाडिया आणि जीशान अयुब खान स्टारर पॉलिटिकल ड्रामा वेब सिरीज ‘तांवड’ प्रदर्शित झाली. प्रदर्शनानंतर या वेब सिरीजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करत बंदीची मागणीही सोशल मीडियावर करण्यात आली. प्रदर्शनानंतर लगेचच ही सिरीज वादात सापडली असून सिरीजला सोशल मीडियावरून जोरदार विरोध सुरू असतानाच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या सिरीजसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून यूजर भडकले आणि त्यांनी तिला ट्रोल केले.

‘तांडव’ सिरीजमधील काही दृश्यांतून तसेच काही भूमिकांच्या नावांमुळे भगवान राम, नारद आणि शंकर या हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचा आरोप करून या सिरीजवर बंदीची मागणी करण्यात येत आहे. सिरीजला होणाऱ्या विरोधाची दखल केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रायलयानेही घेतली असून निर्मात्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. एकूणच या सिरीजला विरोधावरून सोशल मीडियावर सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. अशात आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलीवूडमधील अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या सिरीजवर बंदीच्या मागणीवरून एक ट्विट केले.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये तिने लिहिले, ‘मी हिंदू आहे आणि मी ‘तांडव’मधील कोणत्याही दृश्यामुळे अपमानित वाटून घेत नाही. ‘तांडव’वर बंदी का घातली जावी.’ तिने हे ट्विट करताच यूजरनी त्यावर संताप व्यक्त केला. या ट्विटमुळे भडकलेल्या यूजरनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका यूजरने यावर त्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये वादग्रस्त फिल्म ‘महंमद’ वर महाराष्ट्रात बंदी घालण्याबाबत म्हटले गेले आहे, कारण यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातील. तर, अन्य एका यूजरने मजेशीर मिम शेअर करत स्वराची टर उडवली.

एका यूजरने लिहिले, ‘एवढेही आधुनिक बनू नका, की कोणी तुमच्या धर्माची टिंगल करेल आणि तुम्ही त्याच्यासोबत बसून टाळ्या वाजवाल. जर धर्मच राहिला नाही तर तुम्ही कुठे राहाल?’ तर दुसऱ्या एकाने लिहिले, ‘हिंदू धर्म आणि संस्कृती खूपच दयाळू वृत्तीची आहे. त्यामुळे कोणीही तिला लक्ष्य करतात किंवा असे म्हणूया की काही हिंदूंना आपल्याच काय तर कोणत्याही धर्माबद्दल आस्था नाही. ते स्वार्थी प्रकारचे हिंदू आहेत. ते राजकारणी, फिल्मकार, व्यापारीही असू शकतात, ज्यांना केवळ आपला फायदा महत्त्वाचा आहे.’

swara bhasker get trolled after defend web series tandav