अजय देवगण स्टारर 'रुद्र, द एज ऑफ डार्कनेस' या वेबसीरिजमधून ईशा पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल बऱ्याच काळापासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरनंतर तिने आपला पूर्ण वेळ फॅमिलीसाठी दिला होता. २०१२ मध्ये तिने बॉयफ्रेंड भरत तख्तानी सोबत लग्न केले होते. राध्या आणि मिराया अशी दोन मुलं ईशा आणि भरत यांना आहेत. ना तुम जानो ना हम, धूम, काल अशा एकूण २५  सिनेमांमध्ये ईशाने याआधी काम केले होते.

आता तिला अभिनय क्षेत्रामध्ये पुन्हा आपले नशीब आजमावायचे आहे. अजय देवगण स्टारर ‘रुद्र, द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमधून ती पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ही सीरिज डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ब्रिटिश सायकोलॉजिकल थ्रिलर सीरीज, लुथर या क्राईम ड्रामाचा रिमेक म्हणजे ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’  ही सीरिज असणार आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ईशाने स्वतः ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशाने सांगितले होते की, बऱ्याच काळापासून ती एका चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतीक्षेमध्ये होती. आपल्या अभिनय कौशल्याला एक्स्प्लोअर करता येईल अशा एका वेगळ्या संधीची ती वाट बघत होती. अजय देवगण यांच्यासोबत काम करणे हे तिच्यासाठी एकदम एक्सायटिंग आहे. कारण ती अजयची खूप मोठी फॅन आहे. त्याच्यासोबत काम करण्याच्या संधीची ती वाट बघत होती. त्यासाठी ‘रुद्र – द एज ऑफ डार्कनेस’ ही एक उत्तम संधी तिला मिळाली आहे.

अभिनय क्षेत्रामध्ये आपले नशीब आजमावण्याच्या आधी ईशा एक फुटबॉल प्लेअर होती. त्याचप्रमाणे ती भरतनाट्यम ह्या नृत्य प्रकारात विशारद आहे. आपली आई हेमा मालिनी आणि बहिणीसोबत तिने बऱ्याच स्टेजवर अनेक शो मध्ये परफॉर्म केलेले आहे. ईशाच्या पुनरागमनासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात? कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये.