प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच. शांतीत क्रांती ही वेबसीरिजही अशाच तीन अडचणीत सापडलेल्या मित्रांची कहाणी आहे.

हम्पी सिनेमा फेम अभिनेता ललित प्रभाकर वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ‘शांतीत क्रांती’ असे या वेबसीरिजचे नाव असणार आहे. भाडिपा तर्फे या वेबसीरिजची निर्मिती केली जाणारआहे तर सारंग साठे या सीरिजचे दिग्दर्शक असणार आहेत. अडीअडचणी नाहीत, असे कोणाचेच आयुष्य नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतातच. शांतीत क्रांती ही वेबसीरिजही अशाच तीन अडचणीत सापडलेल्या मित्रांची कहाणी आहे.

तिघांच्याही आयुष्यामध्ये काही ना काही इश्यूज सुरू असतात आणि यातून पळ काढण्यासाठी म्हणून ते गोव्याला जातात. ह्या रोड ट्रिपनंतर त्या तिघांच्या आयुष्याला मिळालेले वळण, आयुष्य बदलवून टाकणाऱ्या घडणाऱ्या घटना यावर आधारित ही सीरिज असणार आहे. प्रसिध्द बॉलीवुड अभिनेती शिखा तलसानिया या सीरिजमधून मराठी वेबसीरिजमध्ये पदार्पण करणार आहे. ही सीरिज सोनी लाइव्ह वर प्रदर्शित होणार आहे.

अनुभव माणसाला नेहमीच काहीतरी शिकवत असतात. या रोड ट्रिप मध्ये आलेले अनुभव या तिघांच्या आयुष्यामधील अडचणी दूर करण्यासाठी कसे कारणीभूत ठरतात यावर आधारित ही सीरिज असणार आहे. असे या सिनेमाचे दिग्दर्शक सारंग साठे यांनी सांगितले आहे. ललित प्रभाकर,  अभय महाजन, आलोक राजवाडे हे प्रसिद्ध कलाकार या सीरिजमध्ये दिसून येतील .

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून ललित प्रभाकरला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले होते. मागच्या वर्षी आलेल्या द रायकर केस मध्येही ललितने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याची झलक दाखवली होती. आनंदी गोपाळ मधला कडक आणि शिस्तप्रिय नवरा देखील त्याने अगदी उत्कृष्ट निभावला हाेता. कलरफुल, तारी आणि झोंबली या आगामी सिनेमांमध्ये ललित दिसून येणार आहे.