अनेक रिॲलिटी शोमध्ये या आधी कोरिओग्राफर आणि डान्सर म्हणूनही मीराने काम केलंय. मीरा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.

हो अगदी बरोबर वाचलं तुम्ही, ‘पती पत्नी आणि ती’ या नात्यामध्ये अनेकदा ‘ती’ म्हणजे सवतची भूमिका केल्यामुळे या अभिनेत्रीचं लग्न जमणे अवघड झालं आहे. ती अभिनेत्री म्हणजे बायको अशी हवी या सिरियलमधली राखीची भूमिका करणारी मीरा जोशी.

मागील ११ वर्षांपासून मराठी, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मीरा जोशी काम करते आहे. माझ्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत मला नेहमी निगेटिव्ह किंवा ग्रे शेडच्या किंवा सवत म्हणून भूमिका मिळाल्या. त्यामुळे लोकांना असं वाटतं की ही अशीच आहे. अभिनयाच्या आधीपासून मला ओळखणारे काही लोक, माझ्या मित्र मैत्रिणी घरच्यांनी तर ह्या निगेटिव्ह मुलीपासून लांब राहा, असा सल्लाही दिला. लग्नासाठी मॅट्रिमोनी साइटवर ज्यांना ज्यांना प्रपोजल पाठवलं त्यांच्याकडूनही असाच प्रतिसाद आला. त्यामुळे अरेंज मॅरेजच्या भानगडीत न पडता आता लव्ह मॅरेजच कर, असा सल्ला माझ्या आई बाबांनी दिल्याचे मीराने मराठी शो डॉट कॉमला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये सांगितले.

एमएक्स प्लेयर’वर आलेल्या ‘इंदोरी इश्क’ वेबसिरीजमध्ये ती एका साध्याभोळ्या भूमिकेत दिसली आहे. या भूमिकेसाठी तिचे लॉकडाऊन दरम्यान घरातूनच ऑडिशन झाले होते. या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदा तिला ऑन स्क्रीन हिरो मिळाल्यामुळे मीरा खूपच खूश आहे. शिवाय नुकताच लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री आणि कोरिओग्राफर मीराने ‘High Range Book Of World Records’ आणि ‘India Records’मध्ये नाव कोरले आहे. मीराने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या संदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे, असा विक्रम करणारी ती पहिलीच अभिनेत्री ठरली आहे

अनेक रिॲलिटी शोमध्ये या आधी कोरिओग्राफर आणि डान्सर म्हणूनही मीराने काम केलंय. मीरा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.