अनुजा साठे या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसली होती. अनुजाने अशरफ भाटकर नावाच्या मुलीचे कॅरेक्टर प्ले केले होते.

२०२० यामध्ये एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेली ‘एक थी बेगम’ ही एक हिट सीरिज ठरली होती. मुळात मराठी असणाऱ्या ह्या सीरिजने हिंदी ऑडियन्सला देखील वेड लावले होते. त्यामुळे या सिरीजचा सेकंड पार्ट हिंदी भाषेमध्ये तयार केला जात आहे. अनुजा साठे या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेमध्ये दिसली होती. अनुजाने अशरफ भाटकर नावाच्या मुलीचे कॅरेक्टर प्ले केले होते. तिचे हे कॅरेक्टर रिअल लाइफ स्टोरीज आणि इव्हेंट्सवर आधारित आहे.

औरंगाबाद मध्ये जन्मलेल्या अश्रफ भाटकरचे बालपण मुंबईमध्ये जाते. मुंबईमध्येच ती झहीर भाटकर नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबद्ध होते. आणि हा झहीर मकसूदचा या इंटरनॅशनल ड्रग माफियासाठी काम करत असतो. त्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये होणारे बदल आणि तिचा प्रवास या सीरिजमध्ये दाखवला आहे. ॲक्शन, सस्पेन्स, थ्रिलर यामुळे ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

अनुजा इंस्टाग्रामवर बरीच ऍक्टिव्ह असते. मध्यंतरी तिने शूटींगच्या लोकेशन्सवरून बिहाइंड द सीन्सचे बरेच फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. एक थी बेगम या सीरिजच्या सेकंड सिजनबद्दल बरेच अपडेट्स ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. एक थी बेगम या सीरिजमध्ये अनुजाने बरेच ऍक्शन सीन स्वतः केले आहेत. इतके कठीण ऍक्शन सीन्स देणाऱ्या अनुजाला डबिंगचे काम मात्र खूपच कठीण वाटते. तशी एक पोस्ट तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केली होती. ‘The most difficult part for an actor’ हे कॅप्शन देत तिने डबिंग स्टुडिओमधून आपला एक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. लवकरच एक थी बेगमचा सेकंड सीजन एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. तुमच्यापैकी कोण कोण या सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहात? कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये.