समीर विध्वंस दिग्दर्शित 'समांतर २' ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने 'समांतर २'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

स्वप्नील जोशी मराठी इंडस्ट्रीमधील एक अतिशय पॉवरफुल नाव आहे. पॉवरफुल याच्यासाठी कारण त्याच्या खात्यामध्ये बरेच हिट सिनेमांच्या नोंदी आहेत. स्वप्नील जोशीच्या करिअरची सुरुवात एक बालकलाकार म्हणून झाली होती. जय श्रीकृष्ण या मालिकेमध्ये त्याने लहान श्रीकृष्णाची भूमिका केली होती. त्यानंतर मात्र त्याला इंडस्ट्रीमध्ये बराच मोठा स्ट्रगल करावा लागला होता. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातून त्याला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राभर पोहोचवलं. तो घराघरात लोकप्रिय झाला. त्यानंतर आलेल्या दुनियादारी मधील श्रेयसने त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन बसवले होते. सिनेमा, मालिका यांमधून सुरू असलेला त्याचा प्रवास पुढे वेबसीरिज पर्यंत आला आहे. एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झालेल्या समांतरने साऱ्या प्रेक्षकांना भुरळ पाडली होती.

स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘समांतर’ने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. सिझन १ मध्ये स्वप्नील जोशीने (कुमार महाजन) नितेश भारद्वाजचा (सुदर्शन चक्रपाणी) शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती. जिथे कुमारचे भविष्य स्पष्ट दिसत होते. त्यामुळे साहजिकच समीर विध्वंस दिग्दर्शित ‘समांतर २’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती, ती यात आता पुढे काय पाहायला मिळणार याची. ही उत्सुकता अधिक न ताणता एमएक्स प्लेअरने ‘समांतर २’चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

दोन व्यक्ती, एका आयुष्यात दोन वेगळ्या काळात सारख्याच नशिबाचा सामना करत आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ कुमारचा भविष्यकाळ ठरवू शकेल? हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागेल. तत्पूर्वी प्रेक्षकांची ही उत्सुकता अधिक वाढवण्यासाठी मराठी एमएक्स ओरिजिनल ‘समांतर २’चा ट्रेलर २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा ट्रेलर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.