अभिनेत्री स्पृहा जोशी (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार )

स्पृहा जोशी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहते. मूळची मुंबईची असलेल्या स्पृहाला आपण अनेक मराठी नाटकांत,  चित्रपटात आणि मालिकांमध्ये पाहिले आहे. स्पृहाला अभिनयाबरोबरच कविता लिहिण्याची आवड आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांची गाणी लिहिलेली आहेत. ‘डबल सीट’ या चित्रपटातील ‘किती सांगायचे मला’ हे स्पृहाने लिहिलेले गाणे चाहते अजून गुंणगुणतात.  स्पृहाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २००४ साली ‘माय बाप’ या चित्रपटातून केली. पुढे तिने ‘गमभन’, ‘अनन्या’ अशा अनेक सुपरहिट नाटकांमध्ये सुंदर अभिनय केला.

२००८ साली ‘अग्निहोत्र’  या मालिकेतून स्पृहाने मालिकांच्या विश्वात पदार्पण केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या गाजलेल्या मालिकांमध्ये काम करत ती प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली. झी मराठीवरच्या ‘उंच माझा झोका’ या मालिकेत स्पृहाने साकारलेल्या  रमाबाई रानडे यांच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक नेहमीच होते. स्पृहाने ‘सूर नवा ध्यास नवा’ या कलर्स मराठीवरच्या संगीत मैफिलीत सूत्रसंचालनाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.  स्पृहाचे अनेक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.

माय बाप

मोरया – अवधूत गुप्ते दिग्दर्शित मोरया या चित्रपटात स्पृहाने अगदी लहान भूमिका साकारली आहे. या चित्रपटात संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर हे मुख्य भूमिकेत दिसतात.

सूर राहू दे

अ पेईंग घोस्ट – उमेश कामत बरोबरच्या या विनोदी चित्रपटात स्पृहाला अतुल परचुरे, शरद केळकर, समीर चौघुले यांचा सोबत अभिनय करण्याची संधी मिळाली.

पैसा पैसा

लॉस्ट अँड फाऊंड – ऋतुराज धळगडे दिग्दर्शित या चित्रपटात स्पृहा बरोबर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत दिसतो.

जाऊन द्या ना बाळासाहेब

मला काहीच प्रॉब्लेम नाही – ताणतणावांनी भरलेल्या या जगात कुटुंबासाठी वेळ काढणे खूप अवघड झाले आहे. हा चित्रपट या गोष्टीवरच आधारित आहे. अजय (गश्मीर महाजनी) आणि केतकी (स्पृहा) या शहरात राहणाऱ्या जोडप्याची ही गोष्ट आहे.

देवा एक अतरंगी

होम स्वीट होम – ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेत्री रीमा लागू आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या बरोबर अभिनय करण्याची संधी स्पृहाला मिळाली.

वेलकम होम

विकी वेलिंगकर