‘शेरनी’मध्ये विद्या बालनचा प्रेक्षकांना थक्क करायला लावणारा परफॉर्मन्स

विद्या बालनचा शेअरनी हा सिनेमा ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमामध्ये विद्या बालन एका वनविभाग अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. शकुंतला देवी, डर्टी पिक्चर, कहाणी अशा विविध भूमिकांनंतर विद्याला वनविभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहणे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक पर्वणी असेल.