अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर

मराठी प्रेक्षकांसाठी ‘जेमप्लेक्स’ प्रस्तुत करीत आहे ‘भुताचा नवीन पत्ता’ शोधत असलेल्या नायिकेची कथा व व्यथा मांडणारा शो ‘कोर्टयार्ड ७०४.’ याचे लेखन व दिग्दर्शन  किरण नारायण कांबळी यांनी व निर्मिती केली आहे प्रकाश तिवारी, रोहन तिवारी, सुरेश अंचन, विशालकुमार पाटील, अभिषेक मजुमदार, रवींद्र महादेव शेट्ये आणि निखिल विठ्ठल चव्हाण यांनी.

‘कोर्टयार्ड ७०४’ चे कथानक हे स्त्रीप्रधान असून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे प्रतीक्षा मुणगेकर. प्रतीक्षा प्रेक्षकांना माहितीच आहे कारण घाडगे अँड सूनमध्ये ती कियाराच्या भूमिकेत दिसली होती.  ‘तू तिथे मी’, पुढचं पाऊल’, ‘छत्रीवाली’, ‘अग्निहोत्र २’, क्राईम पेट्रोल – दस्तक’ (हिंदी) या सारख्या मालिकांमधून ती प्रेक्षकांसमोर आली होती. तिने ‘खैरलांजीच्या माथ्यावर, ‘बाष्ठ, ‘विडा, एक संघर्ष ‘बाबो’ सारख्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका रेखाटल्या. अशी ही प्रतिभासंपन्न अभिनेत्री, प्रतीक्षा मुणगेकर, मराठी वेब सीरिजमध्ये पदार्पण करतेय कोर्टयार्ड ७०४ मधून.

रेवती आपला पती गौतम भागवत सोबत एका सुंदर अपार्टमेंटमध्ये राहावयास येते. परंतु, काही दिवसांतच तिला विचित्र आणि अप्रिय गोष्टींचा प्रत्यय येऊ लागतो. शेजारील वृद्ध जोडपे, रमाकांत आणि मिनाक्षी अधिकारी अचानक  विक्षिप्तपणे वागू लागतात. जेमप्लेक्सची ही ओरिजिनल मराठी वेब सिरीज ‘कोर्टयार्ड ७०४’ २० जुलैला प्रदर्शित झाली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *